मनसे पदाधिकाऱ्यांची एकजूट -निवडणूकीसाठी संघटन बांधणीला गती-उचलला निवडणूक मोहिमेचा झेंडा
मुख्य संपादक - संतोष पांढरे (मोडनिंब)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माढा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कुर्डूवाडी येथे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ताकदीने निवडणुका लढविण्याचा निर्धार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देऊन मार्गदर्शन करताना, आपल्या भागात सक्रियपणे काम सुरु करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, "या निवडणुकीत मनसेचे मजबूत आणि संघटित रूप दिसले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे गरजेचे आहे."
बैठकीस मनसे विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुलराज सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टोणपे, माढा तालुकाध्यक्ष सागर लोकरे, करमाळा-माढा विधानसभा अध्यक्ष आकाश लांडे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सागर बंदपट्टे, टेंभुर्णी शहराध्यक्ष अनिल आरडे यांच्यासह समाधान सुतार, सुमित रेडे, अक्षय रणदिवे, सुशांत मुंडे, देवराज वरपे, सागर गरदडे आणि इतर असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत तालुकास्तरावर पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्याचे आणि जनतेशी थेट संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले.




