मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
राहुल सुर्वे यांची विद्यार्थी आंदोलनातून शैक्षणिक क्षेत्राकडे वाटचाल
बबनरावजी शिंदे माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय, बैरागवाडी (ता. माढा) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षणतज्ज्ञ या पदावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल सुर्वे यांची निवड झाली. या निवडीमुळे महाविद्यालय तसेच परिसरातील शैक्षणिक कार्याला नवे बळ मिळणार आहे.
या निवडीच्या प्रसंगी महाविद्यालयाचे मा. मुख्याध्यापक सुहास दळवी सर, मा. सौदागर केदार सर, मा. अशोक भांगे सर, कर्मचारी मा. दिंगबर सोमासे, मा. सखाराम कायगुडे, नागेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी राहुलराज सुर्वे पाटील यांच्या कार्याचा गौरव करत भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला.
राहुल सुर्वे हे सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहिले आहेत. मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलनांतून शैक्षणिक सुविधा, वसतिगृह समस्या, परीक्षा पद्धती व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये त्यांचा विश्वासार्ह नेता म्हणून परिचय आहे.
आपल्या निवडीनंतर बोलताना राहुल सुर्वे म्हणाले, “बैरागवाडी महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र आहे. या समितीतून मला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. डिजिटल शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रोजगाराभिमुख शिक्षण यावर विशेष भर देणार आहे.”
या निवडीमुळे महाविद्यालयीन परिसरात समाधानाचे वातावरण आहे. अनेक शिक्षक व कर्मचारी यांनी व्यक्त केले की, “राहुलराज यांच्या नेतृत्वामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी नवीन दिशा निर्माण होईल.”





