मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
बहुजन सत्यशोधक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सचिन जावळे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या हस्ते ही घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना अध्यक्ष सुनील ओहोळ म्हणाले की, “देशामध्ये एससी, एसटी आणि धर्मांतरित मूलनिवासी लोकांवर अन्याय-अत्याचार होत असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. उलट अन्यायग्रस्तांवरच गंभीर गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे युवकांनी एकत्र येऊन संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.”ओहोळ यांनी पुढे सांगितले की, एससी-एसटीचा निधी जाणीवपूर्वक वळवला जात आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तात्काळ बंद करण्याची मागणी संघटना करीत असून, कामगार, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महिला यांना मोठ्या प्रमाणात संघटनेत जोडले जात आहे. “फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार घराघरांत पोहोचवणे हे प्रत्येक युवकाचे कर्तव्य आहे आणि संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
नियुक्तीनंतर आपले विचार व्यक्त करताना सचिन जावळे म्हणाले की, “ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ करावी, मराठा-ओबीसी आरक्षण प्रश्न मार्गी लावावा तसेच भूमिहीनांना शेतीचे वाटप व्हावे. आगामी काळात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हेच माझे प्राधान्य राहील.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पश्चिम महाराष्ट्र सदस्य अनिल सरवदे यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष (युवक) राजाभाऊ लांडगे, मल्हारी फाळके, प्रदीप सरवदे, विकास जावळे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.


