Breaking

Sunday, October 12, 2025

मोडनिंब ग्रामपंचायत व घरकुल विभागाविरुद्ध ग्रामस्थांचा निषेध


प्रधानमंत्री घरकुल योजनेत मंजूर नावे रद्द केल्याबद्दल मोडनिंब गावातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी आंदोलनाची घोषणा

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

मोडनिंब (ता.माढा) गावातील काही गोरगरीब लाभार्थ्यांची नावे प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर असताना ग्रामपंचायत मोडनिंब व घरकुल विभाग, पंचायत समिती कुर्डूवाडी यांनी ती नावे जाणूनबुजून रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे संबंधित लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, ग्रामस्थांनी या गोष्टीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अर्जदार श्री सिध्दार्थ (आप्पा)मधुकर शेंडगे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करून लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जावा.

ग्रामस्थांनी दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती कुर्डूवाडी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याची योजना आखली आहे. मोडनिंब व आसपासच्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिकांनी हा निषेध मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रशासनाकडून तातडीने यावर दखल घेऊन कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.