भक्तांच्या तीन दशकांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
पांढरी वस्ती (मोडनिंब) येथील श्री भैरवनाथ मंदिर हे श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. या मंदिरात सभामंडप उभारणीची मागणी गेली तब्बल तीस वर्षांपासून भक्तांकडून होत होती. अनेक वेळा प्रयत्न झाले, चर्चा झाली, पण काम प्रत्यक्षात आले नाही. मात्र आज तो ऐतिहासिक क्षण साक्षीने आला, जेव्हा खासदार आ. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या खासदार निधीतून सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
सभामंडपाचे स्वप्न साकार झाल्याने उपस्थित भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच खासदार मोहिते-पाटील यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारत “हे काम मी पूर्ण करीन” असा दिलेला शब्द आज त्यांनी कृतीत उतरवला.
भक्तांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“गेल्या तीस वर्षांपासून आम्ही या सभामंडपाच्या कामाची वाट पाहत होतो. आज खासदारांनी दिलेला शब्द पाळून आमची मनापासूनची इच्छा पूर्ण केली आहे. भैरवनाथ महाराजांच्या कृपेने हे काम लवकर पूर्ण व्हावे, हीच प्रार्थना.”
या भूमिपूजन सोहळ्यास भारत (आबा) शिंदे, बाबूराव सुर्वे, कुरण (अण्णा) गिड्डे, शिवाजीराजे सुर्वे, बालाजी (भाऊ) पाटील, अॅड. विजयसिंह गिड्डे, हनुमंत यादव, संतोष मुटकुळे, नंदकुमार लादे, अख्तर तांबोळी, फंटू माने, बबन बिनगे, नाना सुर्वे, महावीर चोपडे, नाना बिनगे, प्रसाद पाटील, विकी गिड्डे, गणेश तोडकरी, नवनाथ बिनगे, सत्यवान बिनगे, पंडित बिनगे, बापू माने तसेच हागे, सुर्वे, माने, जेधे आदी सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
भैरवनाथ मंदिर सभामंडप उभारणीमुळे पुढील काळात धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक सोहळे यांना योग्य व्यासपीठ मिळणार आहे. ग्रामस्थांच्या मते, “हा मंडप फक्त बांधकाम नाही, तर श्रद्धेचा आणि एकतेचा प्रतीक आहे.”



