Breaking

Friday, October 10, 2025

करमाळा तालुक्याचा ‘वसंत वक्ता २०२५-२६’ ठरला तनवीर रविंद्र दवणे



श्रद्धेय वसंतरावजी दिवेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत साडेबाराशे विद्यार्थ्यांचा सहभाग — विजेत्यांना ट्रॉफी, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान


करमाळा प्रतिनिधी : अक्षय वरकड

मुख्य संपादक : संतोष पांढरे(बारामती)


श्रद्धेय वसंतरावजी दिवेकर साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेशभाऊ करे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत करमाळा तालुक्यातील विविध शाळांमधून तब्बल साडेबाराशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नववी व दहावी मोठ्या गटामध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, कोर्टीचा इयत्ता नववीतील विद्यार्थी कु. तनवीर रविंद्र दवणे याने उत्कृष्ठ कामगिरी करत २०२५-२६ चा ‘वसंत वक्ता’ हा मानाचा किताब पटकावला.तर लहान गटात (इयत्ता सहावी-सातवी) त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनिअर कॉलेज, टाकळी येथील विद्यार्थी स्वराज रविंद्र दवणे याने प्रथम क्रमांक, आरती अरुण कोकरे हिने द्वितीय क्रमांक आणि वैभव अरुण कोकरे याने तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान अरविंदजी देशमुख यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र, गोल्ड मेडल आणि रोख रक्कम देऊन करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशकल्याणी सेवाभावी संस्था व संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील यांचे विशेष योगदान राहिले. दरवर्षी विद्यार्थ्यांना वक्तृत्वाची प्रेरणा देणारी ही स्पर्धा तालुक्यातील एक महत्त्वाची परंपरा ठरली आहे.