Breaking

Friday, October 31, 2025

शिक्षक अधिकारी स्पर्धा म्हणजे नव्या शिक्षणाची दिशा - केंद्रप्रमुख दिगंबर काळे


डिजिटल, भावनिक आणि सर्जनशील विकासासाठी शासनाचा अभिनव प्रयत्न; उपळाई केंद्र शिक्षण परिषदेत मार्गदर्शन

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

उपळाई (ता. माढा)  येथे शिक्षक अधिकारी स्पर्धा हा उपक्रम म्हणजे नव्या शिक्षण प्रणालीकडे जाणारी दिशा आहे. या स्पर्धेद्वारे शिक्षकांच्या अंगीभूत कौशल्यांना वाव मिळून त्यांच्या कार्यक्षमतेत आणि सर्जनशीलतेत वाढ होईल, असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केले.उपळाई केंद्राच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकत्याच झालेल्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. शासनाने त्रेचाळीस प्रकारांमध्ये शिक्षक अधिकारी स्पर्धेचे आयोजन केले असून, या माध्यमातून शिक्षकांना आपले विचार गतिमान करत डिजिटल, भावनिक, सहकार्यपूर्ण आणि नवोन्मेषी विकास साधता येईल, असे त्यांनी सांगितले. बदलत्या शिक्षण प्रणालीत शिक्षकांनी नवीन प्रयोगांना स्वीकारत विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान अधिक प्रभावीपणे पोहोचवावे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

परिषदेत पांडुरंग शिंदे यांनी स्पर्धेबाबत माहिती पुस्तिकेचे सविस्तर मार्गदर्शन केले, तर धनाजी घाडगे यांनी लिंक भरण्याची प्रक्रिया स्पष्ट केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस माय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षण परिषदेचा शुभारंभ करण्यात आला.प्रास्ताविक व सूत्रसंचालन विठोबा गाडेकर यांनी केले, तर कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार अनिल काळे यांनी मानले. उपळाई केंद्रातील सर्व शिक्षक या परिषदेच्या माध्यमातून सहभागी झाले.