दत्त चौकात ठाक ठाक फटाके, ‘भारत माता की जय’चे घोष आणि आनंदाचा जल्लोष
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीने (एनडीए) एकहाती सत्ता मिळवत मोठा विजय मिळवला असून त्याचा जल्लोष मोडनिंब शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. दत्त चौकात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले होते. फटाक्यांची आतषबाजी, देशभक्तीच्या घोषणा आणि आनंदाचा माहोल यामुळे परिसर उत्साहाने दुमदुमून गेला
या वेळी भाजप शहराध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, “बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विकासदृष्टीवर ठाम विश्वास दाखवला आहे. हा विजय म्हणजे देशाच्या प्रगतीचे पाऊल आणखी मजबूत झाले आहे.”
कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘भाजपाचा विजय असो’ अशा घोषणांचा गजर केला. भाजपचा भगवा स्कार्फ, फटाक्यांची रोषणाई आणि उत्साहाने भरलेले चेहरे—अशा जल्लोषात संपूर्ण दत्त चौक रंगला होता.एनडीएच्या विजयाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दृश्य स्पष्टपणे पाहायला मिळाले. उत्सवाचा माहोल रात्री उशिरापर्यंत सुरु होता.



