मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
मोडनिंब (ता. माढा) येथील संगनबसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशालेचा ३४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वैभवाने साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित मिरवणूक, स्पर्धा, सन्मान समारंभ आणि विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
लेझिम-झांज पथकाचे अप्रतिम सादरीकरण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. सकाळपासूनच मोडनिंब शहरात मुलींच्या लेझिम आणि झांज पथकाच्या तालबद्ध सादरीकरणाने वातावरण दणाणून गेले. विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी पोशाखात, एकसुरात सादर केलेल्या पारंपरिक लेझिम नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनीही या कौशल्यपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले.
समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच पांडुरंग अण्णा पाटील फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.याशिवाय फनी गेम्स, शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धा आणि विद्यार्थिनींनी सादर केलेल्या उपक्रमांनी कार्यक्रमाला अधिक रंगत आणली.
या वर्धापन दिन प्रसंगी पुणे येथील प्रथम महिला महापौर कमलताई व्यवहारे, संस्थापक ज्ञानराज व्यवहारे, माजी सभापती नंदाताई सुर्वे, अध्यक्षस्थानी नागनाथ ओहोळ, सरपंच लक्ष्मी पाटील, ॲड. प्रियंका तळेकर, बाबूराव सुर्वे, एकनाथ सुर्वे, उपसरपंच अमित कोळी, कैलास तोडकरी, वैभव मोरे, दत्तात्रय सुर्वे, सदाशिव पाटोळे, प्रकाश गिड्डे, अशोक साळवी, पोपट दोभाडा, सौदागर जाधव, विशाल मेहता, पल्लवी पाटील, शर्मिला कोळी, प्रथमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापिका संगीता सुर्वे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जून बनसोडे, देविदास परबत आणि शेखर सुर्वे यांनी केले.वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक दत्तात्रय गवळी, अन्वरहुसेन मुलाणी, धनाजी चोपडे, संतोष माने, संजय कोठावळे, चंद्रकांत घाडगे, प्रमोद डांगे , अर्चना चव्हाण, शोभा रोकडे, रूपाली व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले.





