सद्गुरू अण्णा महाराजांचे विनामूल्य मार्गदर्शन भाविकांसाठी आधारवड
मुख्य संपादक : संतोष पांढरे (बारामती)
दौंड तालुक्यातील प्रती गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पडवी माळवाडी येथे दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व श्री दत्त जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. सद्गुरू श्री आण्णा महाराज रंधवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना विधी पार पाडण्यात आला.महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन, पूजा व धर्मकार्यांचा लाभ घेतला.सामूहिक गुरुचरित्र पारायणाला भाविकांची मोठी उपस्थिती होती.दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झालेल्या सामूहिक श्री गुरुचरित्र पारायणाला २०० हून अधिक भाविकांनी सहभाग दिला. पारायणाच्या पठणामुळे परिसरात सतत पवित्र, व्रतस्थ आणि भक्तिरसपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.प्राणप्रतिष्ठापना दिनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७.०० – श्री दत्त महाराजांची आरती
७.०० ते ९.०० – गुरुचरित्र पारायण समाप्ती व सत्यनारायण पूजा
९.०० ते ११.०० – श्री दत्त अभिषेक
११.०३ – श्री दत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना
११.३० ते १.०० – दत्तयाग व होमहवन
दुपारी २.०० ते ४.०० – हरिभजन कार्यक्रम
४.०० ते ६.०० – हे.भ.प. सौ. नेहा ताई भोसले (साळेकर) यांचे कीर्तन
सायं ६.०३ – श्री दत्त महाराज जन्मोत्सव
सायं ७.०० – महाप्रसाद
भाविकांनी दिवसभर उत्साहात सहभाग घेत धार्मिक आनंद लुटला.
श्री क्षेत्र पडवी माळवाडी येथे येणाऱ्या भाविकांच्या समस्यांचे निवारण सद्गुरू आण्णा महाराज गेली २२ वर्षे विनामूल्य करीत आहेत.प्रत्येक गुरुवारी ते भाविकांना“मांसाहार करू नका, व्यसनांपासून दूर रहा, भोंदूबाबांच्या भूलथापांना बळी पडू नका, श्रद्धा ठेवा”असे आध्यात्मिक व सामाजिक मार्गदर्शन करतात.अनेक भाविकांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात बदल घडल्याचा अनुभव व्यक्त केला आहे.
विविध मंडळांचा उत्स्फूर्त सहभागात सोहळा संपन्न झाला.सोहळा यशस्वी करण्यासाठी खालील संस्थांनी उल्लेखनीय भूमिका बजावली श्री दत्त औदुंबर सेवा संस्था सेवेकरी भक्त, श्री क्षेत्र माळवाडी पडवी सुवर्ण मित्र मंडळ, निंबाळकर वस्ती,शिवछत्रपती मंडळ, शितोळे वस्ती हनुमान मित्र मंडळ,जनसेवा तरुण मंडळ,श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान,नागनाथ मित्र मंडळ, पाटस या सर्व मंडळांनी व्यवस्थापन, प्रसाद, शिस्त व भक्तसेवेत महत्वपूर्ण योगदान दिले.


