Breaking

Tuesday, December 23, 2025

मराठा सेवा संघाच्या माढा तालुकाध्यक्षपदी निलेश देशमुख यांची फेरनिवड


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

मराठा सेवा संघाच्या माढा तालुकाध्यक्षपदी तांबवे टें (ता. माढा) येथील निलेश शशिकांत देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

माढा तालुक्यात संघटन वाढीसाठी नवीन पदाधिकारी जोडणे, त्यांचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या जिजाऊ रथयात्रेचे कुर्डूवाडी येथे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. अकलूज येथे पार पडलेल्या मराठा सेवा संघाच्या अधिवेशनातील त्यांच्या योगदानाचाही विचार करून ही फेरनिवड करण्यात आली आहे.

सोलापूर येथे झालेल्या मराठा सेवा संघाच्या बैठकीत विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष अमित निमकर व जिल्हा सचिव धनाजी मस्के यांच्या हस्ते देशमुख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी माढा तालुक्यातून मनोज पवार यांची पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी, तर नागेश व्यवहारे यांची सहकोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.